मुंबई : विदर्भातील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतक-यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज मंत्रालयातील सुरक्षा जाळींवर उड्या मारून आंदोलन (protest) केले. धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी या शेतक-यांनी केली आहे.
यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. परंतु उद्यापर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरामध्ये अप्पर वर्धा धरण आहे. १०३ दिवसांपासून हे शेतकरी मार्शी येथील तहसिलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत होते. मात्र तेथे त्यांना न्याय न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात आक्रमक आंदोलन केले. धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.






