मुंबई: भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे अशी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची ओळख आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून जगात नाव केले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आजही केले जाते.
खाशाबा जाधव यांच्या या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रालाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.
शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली. हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातील सुपुत्र आहेत त्यांनी १९५२मध्ये हेलसिंकी येथील ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठीचे पहिले वैयक्तिक पदक जिंकले. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा करतो.
दरम्यान, खेळाडूंच्या पुरस्कारांची रक्कम वाढवण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. या मागण्यादेखील मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची रक्कम १ लाखावरून ३ लाख तसेच ३ लाखावरून ५ लाख करण्यात आली आहे. यावेळी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने नाव उंचावणाऱ्या नीरज चोप्राचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…