
मुंबई : गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र मुंबई- गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खड्डे काही बुजवता येत नाहीत. हे खड्डे लवकरात लवकर बुजवून किमान एकेरी मार्गावरील वाहतूक १० सप्टेंबर पर्यंत सुरु करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर खड्डे बुजवताना अडथळे येऊ नयेत यासाठी २७ ऑगस्टपासून या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आजही मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बिनबोभाट सुरुच असल्याचे दिसून येते.
?si=ZiJfcvx4IHNMuzNU
गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरून २७ ऑगस्टपासून अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. अवजड वाहनांमुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. तसेच गणपतीच्या आधी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण व्हावी यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चव्हाण यांनी शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील पळस्पे येथे महामार्गाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाण्याचे निर्देश देण्यात आले होते.