Kokan hearted girl : मुंबई-गोवा महामार्गासाठी कोकण हार्टेड गर्लचे गार्‍हाणे! संगीत खुर्चीचो खेळ आटोपलो असात तर...

  533

कोकणवासीयांचा प्रश्न मार्गी लागणार का?


पळस्पे : सध्या राज्यात खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या वेळी चाकरमान्यांना गावी जाताना अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे १५ हजार कोटींचा खर्च करुनही मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa highway) अजून पूर्ण झालेला नाही. या ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांचा (Potholes) व वाहतूक कोंडीचा (Traffic jam) प्रवाशांना सामना करावा लागतो. या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने महामार्गावरून सध्या राजकारण सुरू आहे. याविरोधी पळस्पे येथे मनसेने आयोजित केलेल्या जागर यात्रेत (MNS Jagar yatra) कोकणची कन्या (Kokankanya) अंकिता प्रमोद वालावलकर (Ankita Pramod Walawalkar) सहभागी झाली आणि सर्वांसमक्ष तिने मुंबई-गोवा महामार्गासाठी गार्‍हाणे घातले.


कोकण हार्टेड गर्ल (Kokan hearted girl) म्हणाली, सरकार बर्‍याच जणांचा असा, त्यामुळे सरकारच्या देवाक आपण गार्‍हाणा घालून बघूया, जर महामार्ग झालो तर चांगलाच असा. जोरदार व्हय महाराजाचो आवाज येऊ देत, असं म्हणत तिने कोकणची व्यथा मांडणारे गार्‍हाणे सुरु केले. ती म्हणाली, तळ्यात मळ्यात आणि संगीत खुर्चीचा खेळ आटोपला असेल तर आमच्या महामार्गाच्या प्रश्नावर लक्ष पडू दे रे महाराजा....
तात्पुरत्या खुर्चीचा खेळ आख्खो महाराष्ट्र बघता पण तात्पुरती मलमपट्टी करुची बंद करा रे महाराजा...
मुंबई गोवा महामार्गाचे जे काही प्रश्न असत जे काय अडचणी असतील ते दूर कर... चांद्रयान चंद्रावर खड्डे आणि पाण्याचा तपास करीलच पण आमच्या महामार्गावरील खड्डे आणि पाण्याच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष पडून दे रे महाराजा...





कोण ही कोकणकन्या?


कोकण हार्टेड गर्ल सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या मालवणी भाषेतील व्हिडीओजमुळे ती महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर तिचे लाखोंच्या घरात फोलोअर्स आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिचं 'तूच मोरया' (Tuch Morya) हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे व त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याआधीही बर्‍याचदा तिने कोकणवासीयांचे प्रश्न आपल्या व्हिडीओजच्या माध्यमातून मांडले आहेत. त्यामुळे ती कोकणच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारा एक चेहरा बनली आहे. याचाच वापर करत तिने पुन्हा एकदा गार्‍हाण्याच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला आहे. याची सरकार दखल घेणार का आणि गणेशोत्सवाआधी चाकरमान्यांच्या वाट्याला सुखकर प्रवास येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना