मुंबई: मुंबईच्या सांताक्रुझ (santacruz) येथील गॅलेक्सी हॉटेलमध्ये (galaxy hotel) रविवारी आग लागली. आगीचे लोळ पाहून तेथील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीमध्ये होरपळून आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या विभागाने लगेचच तेथे धाव घेतली आणि हॉटेल खाली करण्यास सांगितले.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आग लागण्याची सूचना मिळताच हॉटेलमध्ये एकच गदारोळ झाला. हॉटेल स्टाफने पटापट हॉटेल खाली केले. सूचना मिळताच त्या ठिकाणी पोहोचलेल्या फायर ब्रिगेडच्या गाडीने बऱ्याच मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत होरपळलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
हॉटेलमध्ये कोणत्या कारणाने आग लागची याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
गॅलॅक्सी हॉटेलमध्ये आग लागण्याचे कारण इलेक्ट्रिक वायरमध्ये ठिणगी उडाल्याने सांगितले जात आहे. वायरमध्ये ठिणगी उडाल्याने हॉटेलच्या रूम नंबर १०३ आणि २०३मध्ये भीषण आग लागली. सूचना मिळताच त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी हॉटेलमधील लोकांना तात्काळ बाहेर काढले. या तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला.
मुंबई फायर ब्रिगेडच्या माहितीनुसार आग हॉटेलच्या रूम नंबर १०३ आणि २०३ मध्ये इलेक्ट्रिक वायरिंग, स्प्लिट एसी युनिट, पडदे-गाद्या, लाकडाच्या फर्निचरला आग लागली होती. याशिवाय इलेक्ट्रिक डक्ट आणि लाँड्री रूम, शिडी, लॉबी आणि पहिल्या ते चौथ्या मजल्यापर्यंत आगपसरली होती.
काही दिवसांआधी तामिळनाडूच्या मदुरै रेल्वे स्टेशनजवळ आग लागल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. मदुरैमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लखनऊ येथून रामेश्वर जाणाऱ्या ट्रेनच्या खासगी कोचमध्ये आग लागल्याने १० लोकांचा मृत्यू झाला होता तर २० जण जखमी झाले होते.
रेल्वे या प्रकरणी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाख रूपये मदतीची घोषणा केली होती. प्रायव्हेट पार्टी कोचने १७ ऑगस्टला लखनऊ येथून आपला प्रवास सुरू केला होता आणि चेन्नईला पोहोचणार होते. यानंतर ते तेथून लखनऊला परतणार होते.
अधिकाऱ्यांच्या मते, आग लागण्याच्या घटनेची सूचना साधारण सकाळी ५.१५ मिनिटांनी मिळाली. त्यावेळेस मदुरै यार्ड जंक्शनवर थांबली होती. रेल्वेच्या माहितीनुसार काही प्रवासी अवैध पद्धतीने गॅस सिलेंडर घेऊन प्रायव्हेट पार्टी कोचमध्ये घुसले होते.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…