Food poisoning in Bhandara : भंडार्‍यातील आश्रमशाळेत ४१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

४ जणांची प्रकृती गंभीर


भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेतील (Ashram School) ४१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Food poisoning) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमसर तालुक्यातील येरली येथील शाळेत हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.


उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर रात्री उशिरा ३६ विद्यार्थ्यांना तुमसर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आणखी पाच जणांची प्रकृती बिघडली. त्यामुळे आता उपचार घेणार्‍या विद्यार्थ्यांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. यातील चार विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात २३ तर तुमसर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात १८ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.


भंडारा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने यासंबंधी सविस्तर माहिती दिली. तिने सांगितल्यानुसार, काल वर्गात गेल्यावर मुलांनी वाटाणा, चणा आणि बटाट्याची भाजी खाल्ली. त्यानंतर काही जणांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला व त्यांनी शिक्षकांना याबद्दल माहिती दिली. त्यामुळे मुलांना ताबडतोब रुग्णालयात आणून उपचार सुरु करण्यात आले.


दरम्यान, रुग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचिता वाघमारे यांनी मुलांना योग्य ते उपचार देण्यात येत आहेत, तसेच ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना इमर्जन्सी सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.