भाजपाच्या गळाला लागणार ठाकरे गटाचा मोठा नेता, चर्चेला उधाण

सिडको : गेल्या वर्षभरापासून ठाकरे गटातील पक्ष गळती काही करता थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत असताना आता पुन्हा एक मोठा नेता भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याबाबत परिसरात मोठया प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे.


गेल्या वर्षभरामध्ये शहर व जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात पक्ष गळती लागल्याचे दिसून येत आहे. ही गळती थांबविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर काही प्रमाणात प्रयत्न देखील सातत्याने सुरू आहेत. मात्र भाजपा व शिंदे गटाकडून नेहमीच ठाकरे गटातील थोड्याफार प्रमाणात का होईना पक्ष प्रवेश आजही सुरू आहेत.


एकीकडे शिर्डी लोकसभेच्या माजी खासदाराने मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश घेतल्याचा सुखद धक्का ठाकरे गटाला मिळाला असतानाच आता येथून पुन्हा एकदा मोठं व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा समोर येत आहे. याबाबत भाजपाच्या वरिष्ठ स्तरावर देखील प्राथमिक बोलणे झाल्याचे समजत असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते.


मात्र ठाकरे गटातील हे व्यक्तिमत्त्व नेमके आहे, तरी कोण ? याबाबत दोन्ही गटाकडून कमालीची गुप्तता ठेवण्यात येत आहे. असे असले तरी पक्षप्रवेश सोहळ्याच्या जय्यत तयारीची चाहूल मात्र लागली आहे. याबाबत परिसरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते देखील प्रवेश करणार असल्याचे समजते. पक्षप्रवेश सोहळा येथे की मुंबईत याबाबत देखील मौन बाळगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

साताऱ्यात खळबळ: यशवंत बँकेत ११२ कोटींचा महाघोटाळा; माजी अध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल

बनावट कर्ज, कागदपत्रांमध्ये फेरफार; ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या निधीचा उद्देशबाह्य वापर करून केलेला आर्थिक

झोपेत पलंगावरून पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका तरुण वाहतूक पोलीस अंमलदाराच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

राज्यातील सरकारी शाळेत मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण

गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने

भाजपाचे विकासाचे, याउलट काँग्रेसचे विनाशाचे राजकारण - बावनकुळे

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे. काँग्रेसने

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली.