
डबलिन: भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यात ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होत आहे. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घगेतली आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या राखीव खेळाडूंना संधी देत तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि आयर्लंड यांच्यात तिसरा सामना
कर्णधार जसप्रीत बुमराहला या सामन्यात गोलंदाजी आणि आपल्या वर्कलोड तसेच संघाच्या बेंच स्ट्रेंथसोबत ताळमेळ राखणे गरजेचे आहे. बुमराहने पहिल्या दोन सामन्यात आठ ओव्हर टाकल्या. बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा जितकी जास्त गोलंदाजी करतील तितका त्यांचा फिटनेस वाढेल आणि ते आशिया कपमध्ये पाकिस्तानसारख्या संघाचा सामना करण्यासाठी चांगल्या फॉर्ममध्य असतील.
बुमराह उघडू शकतो या क्रिकेटर्सचे नशीब
भारताला आशिया कपमध्ये खेळायचे आहे आणि अशातच या दौऱ्यावरील राखीव खेळाडूंकडे लक्ष द्यावेच लागेल. भारताने आधीच या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात आवेश खान, जितेश शर्मा आणि शाहबाज अहमद या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.
या खेळाडूंना मिळणार टी-२० पदार्पणाची संधी
भारतीय संघ मॅनेजमेंट जर संजू सॅमसनला विश्रांती देऊन जितेश शर्माला संधी देत असेल तर फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होईल. सॅमसन संघातील वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याला नक्कीच बाहेर बसायचे नसेल. कारण वर्ल्डकपसाठी त्याचे स्थान निश्चित झालेले नाही. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला सातत्याने संधी मिळत राहिल मात्र त्याच्या कामगिरी सातत्य नाही. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात आवेश खान अथवा मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते.
या प्लेईंग ११सोबत उतरू शकते टीम इंडिया
ऋतुराज गायकवाड़ (उपकप्तान) यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे , रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह