Friday, July 19, 2024
HomeदेशIndia-china: चीन वादादरम्यान जिनपिंग-मोदी यांच्यात होणार चर्चा? परराष्ट्र सचिवांनी दिले हे उत्तर

India-china: चीन वादादरम्यान जिनपिंग-मोदी यांच्यात होणार चर्चा? परराष्ट्र सचिवांनी दिले हे उत्तर

जोहान्सबर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज ब्रिक्स शिखर परिषदेसाठी (brics summit) ३ दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (south africa tour) रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑगस्टला ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत ते अनेक नेत्यांशी चर्चा करतील.

मोदी-जिनपिंग भेट, चर्चा होणार का?

द. आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये १५व्या ब्रिक्स शिखर परिषदेत जगातील मोठे नेते पुन्हा एकदा बऱ्याच मुद्द्यांवर रणनीती बनवण्यासाठी एकत्र येतील. ब्रिक्स परिषदेत सर्वांच्या नजरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीवर आहेत. दरम्यान, जिनपिंग यांच्यासोबतच्या भेटीबाबत सस्पेंस कायम आहे. दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय बैठकीदरम्यान परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, सध्या तरी पंतप्रधान मोदींचा सर्व नेत्यांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम ठरला आहे. या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.

सीमा वादावर होणार चर्चा?

गेल्या काही वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये एलएसीवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाबाबत नुकतीच कोर कमांडर स्तरावरील बैठकीचा १९वा टप्पा पार पडला. कमांडर स्तरावर झालेल्या बैठकीत दोन्ही देश वाद हे बातचीत करून दूर सारण्यास तयार झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून २४ ऑगस्टपर्यंत द. आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग दौऱ्यावर असतील. पंतप्रधान मोदी संध्याकाळी साडेसात वाजता ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स डायलॉगमध्ये सामील होतील. भारतीय वेळेनुसार रात्री साडेनऊच्या सुमारास ते ब्रिक्स लीडर्स रिट्रीटमध्ये सामील होतील.

पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे व्हिडिओ

ब्रिक्स शिखर परिषदेआधी द. आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटर जाँटी -होडस आणि गॅरी कर्स्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वागाताच व्हिडिओ संदेश जारी केला.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -