मुंबई: सध्या वाढत्या आजारांमुळे बरेचजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. मात्र त्यातही अनेकांना सकाळचा नाश्ता आणि जेवणाच्या वेळेबाबत संभ्रम असतो. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण हे हेल्दी असले पाहिजे. मात्र दुपारच्या जेवणाबाबत अनेकजण बिनधास्त असतात. अनेकदा कामाचा वर्क लोड इतका असतो की काहीजण दुपारचे जेवण करणेच टाळतात. अथवा वेळेवर खातच नाहीत.
आरोग्य तज्ञांच्या मते तुम्हालाही ही सवय असेल तर लगेचच बदला. कारण या सवयीमुळे तुमच्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. भूक लागली नसेल तर जबरदस्ती खाऊ नका. जर तुम्ही सकाळी हेल्दी नाश्ता घेतला तर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि ४ ते ५ तास तुमच्या शरीरात एनर्जी राहते.
आता जाणून घेऊया नाश्त्यानंतर जेवणाची योग्य वेळ कोणती असावी ते. जर तुम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता केला असेल तर दुपारी १ वाजेपर्यंत तुम्हाला दुपारचे जेवण घ्यावे लागेल. जर तुम्ही दुपारी १ वाजता जेऊ शकत नसाल तर सकाळी ८ वाजता नाश्ता केल्यानंतर दुपारी १२ ते २ दरम्यान जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा लंच करून घ्या.
दुपारच्या जेवणाचे रूटीन सेट करा. नियमित वेळेत खाण्यास शिका. कधीही खात राहू नका. सकाळच्या ठराविक वेळेतच नाश्ता करा. त्यानंतर काही तासांनी दुपारचे जेवण घ्या.
दिवसभर काही ना काही खात राहू नका. जितके शक्य असेल तितके वेळेवर जेवण घ्या. दोन जेवणामध्ये ३ ते ५ तासांचे अंतर ठेवा. यामुळे शरीराला जेवण पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…