Konkan Ganeshotsav : चाकरमान्यांका खुशखबर! शिवसेनेकडून कोकणात जाऊक मोफत एसटी गाड्या

Share

कोल्हापूरमार्गे जाणाऱ्यांसाठी टोलमाफी

मुंबई : कोकणातला गणेशोत्सव (Konkan Ganeshotsav) म्हटलं की चाकरमान्यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. पटापटा रजा टाकून गावच्या बॅगा भरल्या जातात. पण गावी जाण्यासाठी रेल्वेचे किंवा एसटीचेही तिकीट मिळणे मुश्किल होऊन जाते. बुकिंग सुरु होताच दोन ते तीन दिवसांत फुल्ल होऊन जाते. त्याच पार्श्वभूमीवर गणोशोत्सवासाठी मुंबईहून (Mumbai) कोकणात (Kokan) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेकडून मोफत एसटी (ST) प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी काल शनिवारी एक बैठक पार पडली. यात मोफत एसटीचा व टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून १२ ते १८ मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच दरवर्षी मुंबई गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर मार्गे गेल्यास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि इतर टोल नाक्यांवरील ६०० ते ७०० रुपयांचा टोल माफ होणार आहे. यासाठी मुंबई शहरासोबत पालघर येथील नागरिकांना जवळच्या पोलीस स्थानकातून आरटीओकडून पास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. या नेत्यांसोबतच पक्षाचे इतर पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, यामध्ये अद्याप ऑनलाईन बुकिंवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सुरुवातील कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन बुकिंग नसणार आहे. तसेच या सुविधेसाठी मिळणारा प्रतिसाद पाहून ऑनलाईन बुकिंवर निर्णय घेण्यात येणार आहे.

निलेश राणे यांच्याकडूनही मोफत रेल्वे प्रवास

कोकणात जाण्यासाठी प्रत्येक चाकरमानी प्रचंड उत्सुक असतो. मात्र गाड्या उपलब्ध नसल्याने त्याचा नाईलाज होतो. अशा चाकरमान्यांना खुश करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या स्तरांवर केला जातो. याआधी कुडाळ मालवण विधानसभेचे निवडणूक प्रमुख निलेश राणे यांनीही दादर ते कुडाळ मोफत रेल्वे प्रवास जाहीर केला. यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून १६ सप्टेंबरला ही रेल्वे कोकणात रवाना होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

57 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

58 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

1 hour ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

1 hour ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

1 hour ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago