Nanded crime : धक्कादायक! फळविक्रेत्यावर हसल्यामुळे तरुणाला गमावावे लागले दोन्ही हात

काय झाले नेमके?


नांदेड : रागाच्या भरात हल्ली एखाद्याच्या जीवावर बेतेल इतकी विकृती वाढायला लागली आहे. क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन एखाद्याचा जीव जाईल इतपत हाणामारी होते. नांदेडमधून अशीच एक धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणात एका तरुणाचे हात छाटण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. नांदेडमधील डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात बुधवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. केवळ आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्यानं तरुणाचे दोन्ही हात छाटले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं हात गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर मोहम्मद तौहीद हा आरोपी फरार आहे. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो तर मोहम्मद तोहीद हा तरुण देखील फळविक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी दोघंही आठवडी बाजार परिसरात विक्री करत होते. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी करुन त्याला धार लावली. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तो बाजारात आला. काही क्षणांतच त्याने मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हात छाटले तसेच पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


घटनेनंतर बाजारात धावपळ उडाली होती. घटनेनंतर जखमीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हात छाटल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशा प्रकारे घटना घडल्याने कोयत्याने हात छाटणारी गँग सक्रिय झाल्याचं दिसून येतं आहे.



गुन्हेगारीत वाढ


मागील काही दिवसांत गुन्हेगारी प्रवृत्तीत इतकी वाढ झाली आहे, की माणसाच्या जीवाची किंमतच उरली नाही, अशी परिस्थिती झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच सायनमध्ये एका महिलेला धक्का लागल्यामुळे तिचा पती व ती आक्रमक झाली आणि त्यांनी धक्का मारलेल्या व्यक्तीला थेट रेल्वे रुळावर ढकलून दिले. तो वर येण्याच्या प्रयत्नात असतानाच ट्रेन आली आणि धडक लागून व्यक्तीचा जीव गेला. इतर अनेक घटनांमध्येही समोरच्या माणसाचा आपल्या हातून जीव गेल्याचा कोणताही पश्चात्ताप आरोपीच्या चेहर्‍यावर नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही नक्की कोणत्या पातळीची विकृती आहे, आणि माणसे निष्ठुर बनत चालली आहेत का? अशी चिंताजनक बाब उपस्थित होत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक