शिर्डी : आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील काकडी गावात ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यात झालेला अपुरा पाऊस, भविष्यकाळासाठी सरकारच्या योजना याबाबत बोलताना जरी आपली पद्धत परंपरा वेगळी असली तरी काळानुरुप आपल्याला बदल करावे लागतात असा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार म्हणाले, आजची परिस्थिती पाहता आपल्या राज्यामध्ये अजून बर्याच भागांमध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही. राहिलेल्या काळामध्ये अजून पाऊस पडावा अशी आपली अपेक्षा आहे. जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचे सिग्नल पुढे गेले असल्याची शक्यता आहे. आपल्या परिसरातील धरणंही समाधानकारकरित्या भरलेली नाहीत. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाला होता. मात्र यावर्षी काही ठिकाणी इतका पाऊस झाला की अतोनात नुकसान झाले. आम्हीदेखील शेतकरी आहोत, त्यामुळे शेतकर्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी हे आम्हीदेखील अनुभवतो. आपण काम करत असताना राज्यातील बळीराजा मागे राहू नये म्हणून अनेक गोष्टी त्यांच्या भल्याकरता आपण करतो.
पुढे ते म्हणाले, आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा हे ८०% भरलं आहे. पण धुळे जिल्ह्यात फार कमी पाणी आहे. जळगावचं धरणही भरलेलं नाही त्यामुळे पावसाची नितांत गरज आहे. आपल्याकडे महत्त्वाचं पीक असलेल्या ऊसाने काही ठिकाणी वरदान दिलं. पण आता ऊसापासून फक्त साखर करुन चालत नाही तर वीजही तयार करावी लागते, इथेनॉल तयार करावं लागतं. त्यापासून गाडी कशी चालेल हे पाहावं लागतं. आणि अशा अनेक गोष्टी आपण आता करत आहोत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात आले होते त्यावेळी त्यांनीदेखील आम्हाला इथेनॉल उत्पादन वाढवण्यास सांगितलं, ज्यामुळे परकीय चलन वाचेल. पेट्रोलमध्ये काही टक्के इथेनॉल मिक्स करा त्याने गाड्या उत्तम चालतात. ब्राझीलसारख्या देशामध्ये तर इंजिनात थोडा बदल करुन १००% गाड्या इथेनॉलवर चालतात. त्यामुळे जरी आपली पद्धत परंपरा वेगळी असली तरी काळानुरुप आपल्याला बदल करावे लागतात. त्या बदलांसाठी आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असं अजित पवार म्हणाले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…