Eknath Shinde in Irshalwadi : कार्यतत्पर मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी इर्शाळवाडीत दाखल

  239

निवारा केंद्रांची केली पाहणी


पुढील सहा महिन्यांत पक्की घरे बांधून देणार


रायगड : आज स्वातंत्र्यदिनी (Independence day) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील भूस्खलन (Irshalwadi landslide) दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत दाखल झाले. या ठिकाणी जाऊन त्यांनी निवारा केंद्राची पाहणी केली. येथील सर्व बचावलेल्या लोकांची कंटेनर्समध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना लवकरच पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच आजचा स्वातंत्र्यदिन त्यांनी इर्शाळवाडीतही साजरा केला.


इर्शाळवाडी दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या ४२ कुटुंबांची मुख्यमंत्र्यांनी यावेळेस भेट घेतली. या कुटुंबांशी, येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना व्यवस्थित खायला मिळतंय का, राहण्यात काही अडचणी येत नाहीत ना, या सगळ्याची मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून या कालावधीत सरकारने सर्वांच्या बचावासाठी प्रगतीपथावर काम केलं आहे.



इर्शाळवाडीचं पुनर्वसन करण्यासाठी इर्शाळगडाच्या बाजूलाच असलेली पाच एकरची जागा देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील सहा महिन्यांत सिडकोच्या माध्यमातून त्या ४२ कुटुंबांना पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या तरुण व शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील उपाययोजना करण्यात येणार आहेत. महिला, तरुण यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला जाणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची  व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली