मुंबई : बेस्ट कंत्राटी कर्मचार्यांच्या आठ दिवसांच्या संपानंतर अखेर मागण्या मान्य झाल्याने नुकताच हा संप मागे घेण्यात आला. मात्र दोनच दिवसांनंतर आता एसटी कर्मचार्यांकडून संपाची (ST Strike) हाक देण्यात आली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी हे कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेकडून देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या (Core committee) बैठकीत संपाविषयीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात (Azad maidan) बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. कोकण रेल्वेचे (Konkan Railway) बुकिंगही दोन महिन्यांपूर्वीच फुल्ल झाल्याने आता एसटीने प्रवास करु इच्छिणाऱ्यांचेही हाल होणार आहेत.
१. करारातील तरतुदीनुसार सरकारने ४२% महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा.
२. मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात.
३. दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा.
४. एसटीची धाववेळ (Running time) निश्चित करावी. तसेच वाहकांचे (Conductor)) बदली धोरण रद्द करावे.
५. खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा.
६. लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी २४० हजर दिवसांची अट रद्द करावी.
७. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.
८. अनेक विभागात १०-१२ वर्षापासून कर्मचारी TTS आहेत त्यांना एकवेळची बाब म्हणून TS करण्यात यावे.
९. जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आयपीएल २०२५ मध्ये कॉमेंट्री करत आहे. संजय…
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) राज्यातील नियमांचे उल्लंघन करणारे…
मुंबई : प्रभादेवी – कुरणे चौक मार्गावरील बेस्टच्या बस क्रमांक १६७ मधून प्रवास करत असलेल्या…
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते…
आफ्रिकेच्या सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शो नवी दिल्ली : गिटेक्स या आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या…
दिल्लीतल्या गाजलेल्या खटल्यावर आधारित नवीन वेब सिरीज नवी दिल्ली : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री…