प्रहार    

Good thoughts : आता मंत्रालयात दररोज होणार शिवविचारांचा जागर!

  81

Good thoughts : आता मंत्रालयात दररोज होणार शिवविचारांचा जागर!
मंत्रालयीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर रोज करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी २ ते ३ मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता प्रसारित करण्यात येणार (Good thoughts) आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या संकल्पनेतून आज या उद्घोषणा प्रणालीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.


मंत्रालय हा प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी विविध उद्घोषणा सतत होत असतात. मात्र, याच सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन आता दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर (Shiv thoughts) होणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचार, पराक्रमाची माहिती व्हावी, दररोज मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी –कर्मचारी यांना या शिवरायांच्या विचारातून उर्जा, चैतन्य, स्फूर्ती मिळावी, दिवसाची सुरुवात चैतन्याने व्हावी, अशी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांची संकल्पना होती. त्यांच्या या संकल्पनेस मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्रालयाच्या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन या शिवविचारांच्या जागरास सुरुवात झाली.


गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या डोळ्याला ‘काचबिंदू’

शहरातील ४ हजार ८०० पैकी तब्बल तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद पिंपरी : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे

‘दगडूशेठ हलवाई’च्या गणपतीचा प्रथमच बेल्जियममध्ये दणाणणार जयघोष

गणेशोत्सवात प्रतिकृतीची प्रतिष्ठापना; उत्सवासाठी मूर्ती सुपूर्द पुणे : ‘मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषासह

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

धुक्याने माखलेल्या जंगलात शेकरूंची उधळण जुन्नर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, तर दोन्ही उपमुख्यमंत्री...

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर मुंबई: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ

खेड येथील अपघाताची उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडून दखल, मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

मुंबई: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्ताने दर्शनाला जाणाऱ्या महिला भाविकांच्या पिकअप

मराठ्यांचा अभिमान उजळला! रघुजींचा वारसा सरकारच्या हाती

मुंबई : नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्वाचे