Sunday, May 17, 2026

Chitra Wagh : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र आणि पक्षासाठी नष्टर!

Chitra Wagh : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र आणि पक्षासाठी नष्टर!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या ट्विटने लक्ष वेधले

मुंबई : उद्धव ठाकरे महाराष्ट्र आणि पक्षासाठी नष्टर असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे. यासंदर्भात वाघ यांनी ट्विट केले आहे.

काल मुंबईत संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मस्टरमंत्री झाल्याचे म्हणत डिवचले होते. त्यानंतर आता भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे.

चित्रा वाघ ट्विटमध्ये म्हणाल्या, “स्वतःच्या पक्षासाठी डिझास्टर ठरलेल्या उद्धव ठाकरेंना @uddhavthackeray मस्टर आणि मास्टर ब्लास्टरमधला फरक तो काय कळणार? तुम्ही मुख्यमंत्रीपदी असताना पक्षातील आमदार खासदारांना सांभाळता आले नाही, यापेक्षा मोठं डिझास्टर काय असू शकतं आणि विरोधी पक्षात असताना एकही आमदार देवेंद्र फडणवीसजी @Dev_Fadnavis यांना सोडून गेला नाही, यापेक्षा उत्तम नेतृत्व ते काय असू शकतं?

देवेंद्रजींनी विरोधी पक्षनेते असताना तुमच्या तिघांच्याही दांड्या उडवल्या आणि सत्तेत असताना निर्णयाचे चौकार-षटकार लगावले. देवेंद्रजी मस्टर नव्हे, तर मास्टर ब्लास्टर मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही मात्र राज्य आणि स्वत:चा पक्ष या दोघांसाठीही नष्टर आहात, हेही विसरू नका. अभ्यास कच्चा असल्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्याने मेरिटमध्ये आलेल्यांवर बोलायचे नसते.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा