Wednesday, August 26, 2026

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

मुंबई : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य करण्यात येणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. मात्र, हे वृत्त वस्तुस्थितीला धरून नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. (BMC)

एक टनापेक्षा अधिक वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा कोणताही निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. तसेच मूर्तीच्या जडणघडणीपासून ते गणेश मंडळाला वितरण होईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवणे बंधनकारक करण्याबाबतही कोणतेही निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. ( BMC Ganesh Utsav Guidelines)

त्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अशा संदेशांवर नागरिक आणि गणेश मंडळांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. ( Ganeshotsav 2026)

गणेशमूर्तींच्या आगमनावेळी सुरक्षेची काळजी घ्या

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तींच्या आगमन सोहळ्यादरम्यान सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

">गणेश मंडळांनी आगमन सोहळ्याचे नियोजन करताना पोलीस विभाग, वाहतूक विभाग आणि मुंबई महापालिकेशी आवश्यक समन्वय साधावा, असे प्रशासनाने सांगितले.

गणेशोत्सव उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्व मंडळांनी संबंधित यंत्रणांच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. ( Mumbai Mayor BMC News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >