पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) काल संध्याकाळी पुण्यात दाखल झाले. अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ पोर्टलचे (Sahkar se Samruddhi Portal) उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित आहेत.
या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले, ‘अमितदादांनी सहकार मंत्री झाल्यानंतर अनेक क्रांतिकारी निर्णय या सहकार क्षेत्रात घेण्याचा प्रयत्न केला आहे. एन.डी.ए मध्ये सामील असलेल्या प्रत्येक घटकाचा ताळमेळ जमवणे, वेगवेगळ्या नेत्यांना एक विचार आणि एका सूत्रात बांधणे आणि सगळ्यांना जोडून देशाच्या हितासाठी विचार करणे यालाच सहकारिता म्हणातात आणि तेच अमितजी करत आहेत, अशी मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची प्रशंसा केली.
शाहांनी सहकार क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय सहकार खात्याचं काम उत्तम सुरू आहे. शहा सतत देशहिताचा विचार करतात. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. शहांमुळे सहकार क्षेत्राचा गैरवापर थांबला असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. अमित शहा यांच्यामुळे सहकार क्षेत्रात पारदर्शकता आली आहे. अमित शहा यांच्यामुळे सहकार क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे. शहांना सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.
अमित शहांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. नवं पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम असणार आहे, सहकार क्षेत्रात कार्यकारी निर्णय घेतला आहे. अमित शाहांनी एकदा निश्चय केला की, ते थांबत नाहीत. मोदी आणि शाहांमुळे देशात मोठे बदल होत आहेत. कारखान्यांचा १० हजार कोटींचा कर माफ करण्याचा शाहांनी निर्णय घेतला असून त्यांचं नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अजित पवार म्हणाले आजपर्यंत केंद्रात सहकार विभाग सुरू करण्याची हिंमत अमित शाहांनी दाखवली. बरोबर ना अजितदादा, हे बोलण्याचं अन मान्य करण्याचंही धाडस लागतं. हे कार्य पाहूनच अजितदादांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतल्याचंही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…