Amit Shah Pune Visit : अमित शहा यांच्या पुणे दौर्‍यामुळे वाहतुकीत होणार बदल...

जाणून घ्या कोणते रस्ते कधी सुरु राहणार...


पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १ ऑगस्टला लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पुणे शहराला भेट दिल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) पुण्याच्या दौर्‍यावर आहेत. आज आणि उद्याच्या दिवशी ते पुण्यात असणार आहेत. उद्या ६ ऑगस्टला पुण्यामध्ये ते केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लाँच करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सहकार मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.


पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शहांचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसं नियोजनही पोलिसांकडून केलं जात आहे. मुख्यतः महावीर चौक, दर्शन हॉल लिंक रोड, रिव्हर व्ह्यू चौक या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.



कोणते रस्ते कधी सुरु राहणार?


महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.


दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.


रिव्हर व्ह्यू चौक: अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.


हा सर्व बदल उद्या रविवारी सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे, असे पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी स्पष्ट केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

 
Comments
Add Comment

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा