Yashwant Natyamandir : माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिरचा पडदा अखेर उघडणार...

'या' दिवशी होणार पहिला प्रयोग


मुंबई : माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर (Yashwant Natyamandir) हे नाट्यप्रेमींच्या विशेष आवडीचे आहे. मात्र लॉकडाऊनपासून (Lockdown) नुतनीकरणासाठी हे नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. इथे पुन्हा नाटकाचा प्रयोग कधी होणार आणि कधी तिसरी घंटा वाजणार याच्या प्रतिक्षेत प्रत्येक नाट्यप्रेमी होता. अखेर ही प्रतिक्षा संपली असून उद्या ५ ऑगस्टला यशवंत नाट्यमंदिरात दीर्घ कालावधीनंतर नाटकाचा प्रयोग होणार आहे. याची सुरुवात ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकाने होणार आहे.


लॉकडाऊनपासून बंद असलेले यशवंत नाट्यमंदिर उद्या ५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. उद्या अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ (Vacuum Cleaner) आणि रविवार ६ ऑगस्टला प्रशांत दामले (Prashant Damle) फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (Eka Lagnachi Pudhchi Goshta) या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नाट्यपरिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रशांत दामले यांची निवड झाल्यावर त्यांच्या समितीने नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसेच विश्वस्त मंडळ असे सर्वच यासाठी कामाला लागले होते. ३० मे पासून या नाट्यगृहाचे काम जोरात सुरू झाले होते. आता हे नाट्यगृह प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.


यशवंतराव नाट्यसंकुलात आधुनिक, अद्ययावत सुविधा करण्यात आली आहे. अंतर्गत सजावट, ध्वनियंत्रणा, स्वच्छतागृह अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या नव्या संकुलात पार्किंगचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या या आवडत्या नाट्यगृहात प्रयोगांचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा