नंदुरबार : गणेशोत्सवाला (Ganeshotsav) अवघा दीड महिना राहिल्याने विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु केली आहे. गणेशमूर्ती (Ganesh Idols) साकारणार्यांचे कामही जोरात सुरु आहे. कोरोना काळात असलेले निर्बंध आणि गणेश मूर्तींच्या उंचीवरील मर्यादा यामुळे गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांवर मोठ्या आर्थिक संकट आले होते. यंदा गणपती मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा उठवल्याने मोठमोठ्या मूर्तींनाही प्रचंड मागणी आहे. मात्र मूर्ती बनवण्यासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने यंदा गणेशमूर्तींची किंमत ३०% ने वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी भाविकांमधील गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे.
पेणमध्ये साकारल्या जाणार्या गणेशमूर्तींना राज्यातच नव्हे तर परदेशातही मागणी असते. पेणनंतर नंदुरबारच्या (Nadurbar) गणेशमूर्तींना बाजारात मोठी मागणी असते गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागात नंदुरबारमधून गणेश मूर्ती जात असतात. नंदुरबार शहरात गणेश मूर्ती बनवणारे लहान मोठे १०० कारखाने असून हजारो गणेश मूर्ती साकारल्या गेल्या आहेत. सात इंचापासून २२ फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या असून यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र या वाढीमुळे लहान मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा काही प्रमाणात हिरमोड होत आहे.
आणखी एक विशेष बाब म्हणजे, गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे ४ फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुटांपेक्षा कमी असलेल्या मूर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना ‘एक खिडकी’ पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…