पेण : शिर्डीचे साई बाबा (Sai Baba Shirdi) तसेच राष्ट्रपुरुष, संत महात्म्यांबाबत वारंवार वादग्रस्त विधान करणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडेंची (Sambhaji Bhide) ६ ऑगस्ट रोजी पेण येथे होणारी सभा रद्द करावी व कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा यासाठी पेण मधील शेकडो साई भक्तांनी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस (Pen Police Station) निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन दिले आहे.
हिंदुस्थानासोबत जगातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे शिर्डीचे साईबाबा व राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले यांच्या बद्दल मनोहर उर्फ संभाजी भिडेंनी वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे सर्व साईभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्तव्य करुन नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम संभाजी भिडे करत आहेत. त्यामुळे भिडे यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच भिडे हे सातत्याने करत असलेल्या भडकाऊ आणि वादग्रस्त विधानांनी या देशामध्ये काहीतरी वेगळंच घडवून आणायचं आहे का ? असा सवाल या निवेदनातून करण्यात आला आहे.
पेण हे अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडते, त्यामुळे ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संभाजी भिडे यांच्या पेण येथे होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये. तसेच आयोजकांवर आणि सोशल मीडियावर जाहिरात पोस्ट करून वातावरण बिघडवणाऱ्यांवर भारतीय दंड संहिते नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी साईभक्तांच्या वतीने ओम साई पदयाञी मंडळाचे साई भक्त कल्पेश ठाकूर, मितेश भानुशाली, दिनेश खामकर, महेश म्हात्रे, कमलाकर पाटील, दिनेश पाटील, हिरामण भोईर, संजय भोईर, गणेश जांभळे, राकेश गावंड यांनी पेण तहसिलदार व पेण पोलिसांकडे लेखी निवेदन देत केली आहे. संभाजी भिडे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३४, १०७, १५३ अ, २९५ अ, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…