पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya Tilak Purskar) प्रदानाचा कार्यक्रम पार पडताच मोदीजी थेट शिवाजीनगरला होणार्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचंही उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कर्नाटक सरकारला लक्ष्य केले. कर्नाटकात सरकार बदललं आणि दुष्परिणाम दिसायला लागले, असं म्हणत मोदीजींनी विरोधकांवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, फिनटेक, बायोटेक, अॅग्रीटेक प्रत्येक क्षेत्रात देश प्रगती करत आहे. याचा मोठा लाभ पुण्यालादेखील होत आहे. एकीकडे महाराष्ट्रात विकास होत आहे तर दुसरीकडे शेजारचं राज्य कर्नाटकात काय होतंय ते समोर येत आहे. बंगळूरू मोठं आयटी हब आणि ग्लोबल इन्व्हेस्टर सेंटर आहे. यावेळी कर्नाटकाचा गतीने विकास होणं अपेक्षित होतं परंतु सरकार बदललं आणि जनतेचं नुकसान झालं. कर्नाटकमध्ये ज्या प्रकारच्या घोषणा करुन सरकार बनवलं त्याचे दुष्परिणाम कमी वेळेत दिसून येऊ लागले आहेत. जेव्हा कोणता पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारची तिजोरी मोकळी करतो तेव्हा जनतेचं, तरुणांचं मोठं नुकसान होत असतं. त्या पक्षाचं सरकार तर बनतं परंतु लोकांचं भविष्य अंधारात जातं.
कर्नाटक सरकार मान्य करत आहे की, त्यांच्याकडे बंगळूरु आणि कर्नाटकाच्या विकासासाठी बजेट नाही. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. अशीच स्थिती राजस्थानमध्येही आहे. कर्जाचा बोजा वाढतोय आणि विकास ठप्प झाला आहे. नीती, नियत आणि निष्ठा विकासासाठी आवश्यक असते, असं मोदी म्हणाले.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…