Uddhav Thackeray Thane Melava : धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूकथेत उद्धव ठाकरे व्हिलन

  288

नितेश राणे यांनी काँग्रेस नेत्यांचाही घेतला समाचार


कणकवली : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यात उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मेळावा भरवला. येथे धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) साहेबांबद्दल त्यांनी स्तुती केली. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी 'ज्या आनंद दिघे साहेबांचे ठाकरे नाव घेतात, त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरेंच्या कुटुंबातील एकही जण का उपस्थित नव्हता?' अशी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनीही आपली परखड मते मांडली असून उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.


नितेश राणे म्हणाले, 'ठाण्यात जाऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल संजय राऊत आणि त्याचे मालक उद्धव ठाकरे मोठ मोठे बोल बोलले. मात्र धर्मवीर आनंद दिघे यांना मानसिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिला होता. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्यात काड्या लावण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले होते. आनंद दिघेंचा द्वेष उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय करायचे हे सर्व शिवसैनिकांना माहित आहे. दिघे साहेबांच्या मुत्यूची कथा जेव्हा लिहिली जाईल तेव्हा त्यात उद्धव ठाकरे यांचा रोल व्हीलनचा असेल. समझनेवाले को इशारा काफी है..! अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली.


धर्मवीर चित्रपटात जो पत्रकार बाळासाहेब, आनंद दिघे, शिवसेना यांच्या बद्दल नकारात्मक प्रश्न विचारतो तो संजय राऊत आहे. हा राऊत अगोदर सेना, आनंद दिघे, बाळासाहेब यांच्या विरोधात होता. त्यामुळे धर्मवीर दिघे साहेब मर्द होतेच, तुमच्या सारखे नामर्द नव्हते.



तुमचा किती हिंदू राहिला आहे?


सुंता झालेल्या मौला उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वाची सर्टिफिकेट नको. तुमचा किती हिंदू राहिला आहे ? तुम्ही हिंदुत्व शब्द उच्चारण्याइतकेही हिंदू राहिलेला नाहीत. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी सुनावले.



अग्रलेख लिहिणाऱ्याने ज्ञान घ्यावे


स्वतंत्र काळात आणि त्यानंतर राष्ट्र संघ नसता, आरएसएस नसता आणि हेगडेवार साहेब व त्यांचे कार्यकर्ते नसते तर आज देशात हिंदू राहिला नसता. इस्लाम राष्ट्र झाले असते. अग्रलेख लिहिणाऱ्याने ज्ञान घ्यावे. आज त्यांच्यामुळेच आम्ही सर्व आहेत. आणीबाणी वेळी तुमची भूमिका काय होती हे देशाला कळू दे ते आधी सांगा, असे नितेश राणे यांनी संजय राऊतांना सुनावलं.



तुमची तर खटारा गाडी


अजित दादांना भेटायला गेलात तेव्हा ७० हजार कोटी दिसले नाहीत. सरड्याला पण लाज वाटेल एवढ्या जलद उद्धव ठाकरे रंग बदलतात. भाजपच्या गाडीत खूप जागा आहे. आमची गाडी स्पोर्ट व्हॅन आहे. तुमची तर खटारा गाडी आहे. आम्ही किती खरे आहोत असे प्रत्येक चायनीज कंपन्या सांगत असतात. तसेच संजय राऊत आणि त्यांचा मालक ओरडुन सांगत आहेत.



कोण नालायक आणि कोण लायक हे सर्वांना माहीत


२०१९ पर्यंत आमदारकीसाठी मेहुण्याला वाचवावे म्हणून भेटलात तेव्हा मोदी साहेब हुकूमशाह वाटले नाहीत का? असा सवाल नितेश राणेंनी केला. कोण नालायक आणि कोण लायक आहेत ते सर्वांना माहीत आहे. हो, मी बाळासाहेबांना मुलगा आहे असे सांगावे लागते यातच सर्व आले, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.



काँग्रेस नेत्यांचाही घेतला समाचार


भिडे गुरुजींचा आणि भाजप यांचा काही संबंध नाही. त्यांची स्वतंत्र संघटना आहे. जे काँग्रसचे लोक त्यांच्यावर टीका करतात त्यात पृथ्वीराज चव्हाण किंवा इतर नेते आहेत. जे टीका करतात ते सांगतील काय की निवडून येण्यासाठी किती मते भिडे गुरुजींची मिळवली आहेत. हे पृथ्वीराज चव्हाण टीका करतात ते निवडून येण्यासाठी नतमस्तक होतात याचे फोटो आहेत. २०२४ ला निवडून येण्यासाठी भिडे गुरुजींची मदत घेणार नाही हे आधी जाहीर करावे आणि मग टीका करावी.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी