मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार पावसामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला (NCP office inauguration) उपस्थित राहण्याचा आपला नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळत आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर झाला असल्याने अजित पवार यांनी स्वतः हा कार्यक्रम रद्द केला आहे. काही दिवसांनंतर हा कार्यक्रम पुन्हा नियोजित करण्यात येईल, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
अजित पवार यांनी व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईमध्ये सगळ्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. सरकारने आवाहन केलं आहे की, कामाशिवाय कोणी घराबाहेर पडू नका, घरातच राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जेव्हा आम्हीच सर्वांना अशा प्रकारचं आवाहन करतो, तेव्हा स्वतः निघून ठाणे परिसरात येणं मला उचित वाटलं नाही. पुढे ते म्हणाले, ज्या दिवशी सरकारने कोणताही अलर्ट जाहीर केलेला नसेल, त्या दिवशी मी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करेन.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…