मुंबई : ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी दोन भागांत घेतलेल्या मुलाखतीवर भाजपाने जोरदार टीका केली आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कवितेच्या माध्यमातून उपरोधिक टीका केली आहे.
“प्रत्येक प्रश्नावर नुसत्या तोंडच्याच वाफा, तीच जुनी कॅसेट आणि नुसत्याच थापा!”, असे म्हणत केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. त्यांनी याबाबत एक कविताच ट्वीट केली आहे.
‘विपरीत बुद्धी’ वाल्यांचा बुद्धिबळाचा डाव,
प्यादी निघून गेल्याचा सहनच होईना घाव !
इथे सरळ चालतो उंट अन् हत्ती तिरका,
आता, फक्त राजाच शिल्लक आहे बरं का !
सत्तेच्या मस्तीत ‘राजा’ची गुंग होती मती,
मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती !
प्रत्येक प्रश्नावर नुसत्या तोंडच्याच वाफा
तीच जुनी कॅसेट आणि नुसत्याच थापा !
‘वजीर’ देतो शिव्या, राखण्या राजाची मर्जी,
सारीपाटावर दोघांना मोहऱ्यांची एलर्जी,
घरातनं बाहेर न पडलेला पाहिलाय ‘राजा’
शेवटी, चेकमेट झाला अन् उडाला बँडबाजा !
उद्धव ठाकरे यांच्या पॉडकास्टचा पहिला भाग काल (२६ जुलै) प्रसिद्ध झाला होता. तेव्हाही त्यांनी चारोळीतून टीका केली होती.
तेच ते… तेच ते…
माकडछाप दंतमंजन,
तोच ‘जोडा’ तेच रंजन
तीच ‘रडगाणी’ तेच तराणे,
‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे
सकाळपासून रात्रीपर्यंत…
तेच ते… तेच ते
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…