पुणे : खडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. आज संध्याकाळी ५.०० वाजता खडकवासला धरणातून १ हजार क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासने केले आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरण प्रकल्पात आता पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची तूर्त चिंता मिटली आहे. धरणांमध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत १७.२१ टीएमसी पाणीसाठले आहे. यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट देखील टळले आहे.
पुण्याला प्रामुख्याने खडकवासला धरण साखळीतून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासूंन या धरण साखलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला साखळी प्रकल्पात ५९.०३ टक्के म्हणजेच १७.२१ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण प्रकल्पात २०.४८ टीएमसी पाणीसाठा होता.
दरम्यान, आज खडकवासला धरण पूर्ण भरण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. आज संध्याकाळी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…