मुंबई : उबाठा गट युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची मुंबई पोलिसांच्या एसआयटीकडून कसून चौकशी आहे. कोविड घोटाळा प्रकरणात ईडी चौकशी झाल्यानंतर आता मुंबईची एसआयटी टीम सुद्धा सूरज चव्हाण याची चौकशी करत आहे. या चौकशीसाठी सुरज चव्हाण हे मुंबई पोलिसांच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले आहेत.
पालिकेच्या जम्बो कोव्हिड केअर सेंटर घोटाळ्या प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणी मनी लॉड्रिंग चा तपास करणाऱ्या इडीने आधी सुजित पाटकर आणि दहिसर जंबो कोव्हिड सेंटरचे डीन किशोर बिसुरे यांना अटक केली आहे. इडीने केलेल्या तपासात समोर आलेल्या माहिती आर्थिक गुन्हे शाखेला सुपूर्त केली. त्याच माहितीच्या आधारे सूरज चव्हाण यांची चौकशी सुरू आहे.
कॅगने मुंबई महापालिकेच्या बारा हजार कोटी रुपयांच्या खर्चात झालेली कथित अनियमितता अधोरेखित केली होती. पालिकेच्या नऊ विभागांनी केलेल्या एकूण १२ हजार कोटींच्या खर्चात अनियमितता असल्याचा कॅगचा अहवाल होता.
या प्रकरणात मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं देखील नाव समोर येत आलं होतं. मात्र किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आता ईडीकडून करण्यात येत आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…