Nitesh Rane : उद्धव ठाकरेंना संजय राऊत करतात ब्लॅकमेल; पक्ष संपला तरी ठाकरे आहेत गप्प!

उबाठा सेनेच्या आमदाराने माहिती दिल्याचा आमदार नितेश राणेंचा गौप्यस्फोट


कणकवली : 'गेल्याच आठवड्यात उबाठा सेनेचा एक आमदार मला आमदार निवासात भेटला. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) काही खास कागदपत्रे संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांच्याकडे आहेत आणि म्हणूनच उबाठा सेना संपली, पक्ष संपला, कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष सोडून जाऊ लागले तरीही त्या संजय राऊतबद्दल उद्धव ठाकरे एकही शब्द काढत नाहीत. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत ब्लॅकमेल करत आहे आणि त्यामुळेच त्यांचा अत्याचार पक्षातील पदाधिकाऱ्यांपासून कार्यकत्यांपर्यंत सर्वांना सहन करावा लागतो, अशी माहिती आपल्याला उबाठा सेनेच्या एका आमदाराने दिली', असा गौप्यस्फोट भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.



उबाठा पक्ष फुटू नये म्हणून मुख्यमंत्री शिंदेंबद्दल अफवा पसरवल्या जातात


कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'आज अनेक लोक संजय राऊत यांच्यामुळे पक्ष सोडत आहेत. मात्र पक्ष उद्ध्वस्त झाला तरी त्यांना उद्धव ठाकरे हे काही बोलत नाहीत. आता काय होणार याची चिंता आम्हा सर्वांनाच आहे', असे त्या आमदाराने आपल्याला सांगितले असे सांगत आमदार नितेश राणे म्हणाले, स्वतःचा उबाठा पक्ष फुटू लागला, अनेक आमदार मूळ शिवसेनेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत जाऊ लागले हे लक्षात घेऊन संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शिंदे हे मुख्यमंत्रीपदी राहणार नाहीत. अजितदादा मुख्यमंत्री होतील, अशा पद्धतीच्या अफवा पसरवणे सुरू केले आहे.



मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचा व्यक्ती लवकरच शिंदे सेनेत होणार दाखल


उबाठा सेनेमधील लोकांचे शिवसेनेत होणारे प्रवेश थांबविण्यासाठी अफवा पसरवून राज्यात आपल्या पक्षाला वाचविण्याचे प्रयत्न केले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांनी याबाबत यापूर्वीच स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री म्हणून कार्यकाल पूर्ण करतील, असे सांगितले आहे.



आता कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे सेना फुटणार....


लवकरच मातोश्रीच्या किचन केबिनेटचा व्यक्ती शिंदे सेनेत जी मुळ शिवसेना आहे त्यात प्रवेश करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.



उद्धव ठाकरेंची नौटंकी, ते इर्शाळवाडीत गेलेच नाहीत


उद्धव ठाकरे हे इर्शाळवाडीत गेलेच नाहीत. पायथ्याशीच चार लोकांना जमा करून भाषण करून मागे फिरले. ते फक्त नौटंकी करण्यासाठी तिथे गेले होते. जसे मुख्यमंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ मिनिटांचा दौरा केला. गेल्या आठवड्यात विधान परिषदेत फक्त ४३ मिनिटे बसले. त्यात २० मिनिटे अजितदादांना भेटून नंतर कड्या लावण्यात गेली. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सभागृहात बसत नाहीत. ते काय जनसेवा करणार? असा सवालही आमदार नितेश राणे यांनी केला...


'चक्की पिसायला जायचे नाही म्हणून भाजपसोबत गेलो, असे राष्ट्रवादीच्या आमदाराने आपल्याला सांगितले', असे संजय राऊत सांगतात. त्या राऊतांची विश्वासार्हता काय? त्यांनी आधी आपले कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावे, असा टोलाही आ. राणे यांनी लगावला.



खरी मम्मी दिल्लीत बसते


पेंग्विन ठाकरेना माहीत नसेल खरी मम्मी दिल्लीत बसते. मुख्यमंत्री होते, त्यावेळी उद्धव ठाकरे सोनिया गांधींना दिल्ली येथे जाऊन दंडवत घालत होते. उद्धव ठाकरे यांनी पावलोपावली शरणागती पत्करलेली आहे. ते शब्दाचे पक्के नाहीत. अशा शरणागतीत त्यांची पीएचडी झालेली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार तेव्हाच आमदारकीचा राजीनामा देणार म्हणून घोषणा केली होती. ती घोषणा कुठे राहिली.


स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शब्दाचे पक्के होते. दिलेला शब्द त्यांनी कधीही मागे घेतलेला नाही. ब्रॉडकास्टवर रश्मी ठाकरे वहिनींची मुलाखत घेतली पाहिजे. जेणेकरून कळेल की कोणी सरकार चालवले, असे आ. राणे म्हणाले.



अमित ठाकरे कधीही टोलनाका फोडायला सांगणार नाहीत


अमित ठाकरे कधीही टोलनाका फोडायला सांगणार नाहीत. राज ठाकरे यांचे कुटुंब आणि आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंब यात जमीन आस्मानाचा फरक आहे. कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहीपणामुळे असे होते. अमित ठाकरे असे करणार नाहीत. त्यांच्यात आणि आदित्य यांच्यात फरक आहे, असेही आ. राणे म्हणाले.


@NiteshNRane


मी एका उबाठा आमदाराला आमदार निवासात भेटल्यानंतरची चर्चा.. मी - कसे चालले आहे.....


उबाठा आमदार तुम्हाला माहीतच आहे साहेब.....


मी - तुमचं भविष्य काय?


उबाठा आमदार काय माहीत बघू काय होतं ते..... मी- उद्धवजींशी तुम्ही चर्चा का करत नाही ? उबाठा आमदार त्यांनी ऐकलं तर पाहिजे....


मी - मग परिस्थिती तशीच आहे अजून !


उबाठा आमदार हो, तो संजय राऊत त्यांना ब्लॅकमेल करतो. मी ब्लॅकमेल ?


उबाठा आमदार - हो, कायतरी कागदपत्रे त्याच्याकडे आहेत म्हणून मातोश्रीमधले त्यांना घाबरतात... इतकं त्यांच्यामुळे उद्ध्वस्त झालं तरी त्यांना काही बोलत नाहीत... सगळंच संपणार! एक दुसऱ्याला हात मिळवले आणि निघालो....



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत