रायगड : इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेमुळे (Irshalwadi Landslide) अख्खा महाराष्ट्रच हादरला आहे. राज्यभरातून अनेक ठिकाणांहून दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. घटनेला तीन दिवस झाले असले तरी अजूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र याबाबत रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samat) यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक माहिती दिली आहे. उद्यापासून इर्शाळवाडीतील बचावकार्य बंद करण्यात येईल, परंतु या ठिकाणी जी मुलं अनाथ झाली आहेत, त्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल, असं उदय सामंत यावेळी म्हणाले.
इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ज्या काही उपापयोजना करणे गरजेचे आहे, त्या केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी योग्य ती मदत जाहीर केली आहे. परंतु यातील भयावह, दुःखदायक आणि क्लेशदायक बाब म्हणजे २२ मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल. हा प्रसंग खूप जलद गतीने झाला त्यामुळे कोणताही निर्णय घेणं कठीण आहे. मात्र दुर्घटनाग्रस्त अनाथ मुलं किंवा इतर लोकांनाही शासन वार्यावर सोडणार नाही, हा माझा पालकमंत्री म्हणून शब्द आहे, असं उदय सामंत म्हणाले.
कलम १४४ नुसार इर्शाळगडावर येण्यास जी बंदी घातली आहे, ती आणखी वाढणार किंवा किती दिवस राहणार याबाबतचा संपूर्ण निर्णय जिल्हाधिकार्यांचा राहील, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसेच सर्व दुर्घटनाग्रस्तांची आज संध्याकाळपर्यंत तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था होईल. डायमंड पेट्रोल पम्प येथे तात्पुरती जागा घेण्यात आली आहे व तिथे कंटेनरमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात येईल. युद्धपातळीवर, कुठेही एक-दोन वर्षे वाया न घालवता त्यांचं पुनर्वसन चांगल्या घरांमध्ये करण्यात येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी दिला.
मृतांचा आणि जखमींचा आकडा
दरम्यान, रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आतापर्यंत २९ इतका झाला आहे. तर ५२ जण अद्याप बेपत्ता आहेत. या ठिकाणी आजही बचाव मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…