Tiger death : टिपेश्वर अभयारण्यात सापडला वाघाचा मृतदेह

मृत्यूचे कारण अस्पष्ट


पांढरकवडा : यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्यांतर्गत (Tipeshwar Sanctuary) पाटणबोरी वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत अर्ली वर्तुळातील, भवानखोरी बिट कक्ष क्र. १०५ मध्ये गुरुवारी सकाळी एक नर वाघ मृतावस्थेत आढळून (Tiger death) आला. या वाघाचं वय अंदाजे दीड ते दोन वर्षे आहे. गस्तीवरच्या वनरक्षकांना हा मृतदेह आढळून आला. दरम्यान, हा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


गुरुवारी सकाळी वनरक्षक राजू तुमराम हे हंगामी मजुरांसह अर्ली वन वर्तुळातील, भवानखोरी बिट कक्ष क्र. १०५ मध्ये गस्त करीत असताना त्यांना एका वाघाचे शव निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. यामुळे वनवर्तुळात खळबळ उडाली असून वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे.


घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन मृत वाघाचे निरीक्षण केले. प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. मृत वाघ हा नर असून त्याचे संपूर्ण अवयव मृत्यूपूर्वी शाबूत असल्याचे निरीक्षणातून समजले आहे. तसेच वनअधिकारी यांनी आजूबाजूच्या परिसरात फिरती केली असता कुठेही मानवी पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत.


पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत वाघाचे त्यानंतर सर्वांसमक्ष शवविच्छेदन (Autopsy) केले. शवविच्छेदनाचे आवश्यक ते सीलबंद नमुने तपासणीसाठी उपसंचालक, प्रादेशिक न्याय सहायक, वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती येथे पाठविण्यात येणार आहेत. वाघाचा मृत्यू कशामुळे झाला, हे तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कळू शकणार आहे. या घटनेचा तपास सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) रवींद्र कोंडावार करीत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Bhimashankar Temple: ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद; जाणून घ्या कारण

पुणे: महाराष्ट्र जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर या महिन्यात महाशिवरात्री

एसटीच्या नव्या बसेसचे नामकरण 'राजमाता जिजाऊ'; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या

Palghar: पालघरमध्ये धक्कादायक प्रकार उघड; औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी, मुद्देमाल जप्त

पालघर: पालघरमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी सुरु असल्याचा हा प्रकार समोर

अनाथाश्रमात राहिलेला मुलगा झाला नेदरलँडचा महापौर, आईला शोधत ४० वर्षांनी नागपूरला आला

नागपूर : नेदरलँड्समधील हीमस्टेडचे ​​महापौर फाल्गुन बिनेन्डिज्क तब्बल ४० वर्षांनंतर जन्मदात्या आईचा शोध घेत

Jalna Food Poisoning: पाणीपुरी खाल्ल्याने १६ जण रुग्णालयात, जालन्यात नेमकं घडलं काय?

जालना: जालन्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल १५ ते १६ जणांना उलट्या-जुलाबाचा

Solapur ZP Election News: सोलापुरात चक्क ईव्हीएम मशीनवर जादूटोणा? मतदारांमध्ये भीतीचं वातावरण

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. येथे