Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीRasta Roko protest : तीन युवकांच्या अपघाती मृत्यूनंतर शिरवाडे फाट्यावर संतप्त नागरिकांचा...

Rasta Roko protest : तीन युवकांच्या अपघाती मृत्यूनंतर शिरवाडे फाट्यावर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

केंद्रीय राज्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट

संतप्त नागरिकांनी उड्डाण पुलाची केली मागणी

निफाड : चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने पिंपळगावकडे येणाऱ्या बसने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील तीन युवकांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेने पंचक्रोशीतील नागरिक संतप्त होऊन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग तीन वरील शिरवाडे फाट्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko protest) करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी रोज एक अपघात होऊन जीवीत हानी होत असल्याने हे घटनास्थळ अपघात स्थळ घोषित करण्यासोबत उड्डाण पुल (Flyover) बांधावा अशी मागणीही यावेळी संतप्त जमावाने केली.

महेश चंद्रकांत निफाडे, सुभाष माणिकराव निफाडे आणि नितीन भास्कर निफाडे राहणार तिघेही शिरवाडे वणी फाट्यावर हे त्यांच्या दुचाकीजवळ उभे होते. तेव्हा चांदवड बाजूकडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या एस. टी. बसने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. पिंपळगाव रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी ज्ञानेश्वर कारभारी निफाडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बस चालक दिपक शांताराम पाटील राहणार धरनगांव जिल्हा जळगांव यांच्यावर दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत असल्याचा व अपघाताची खबर न देता पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस हवालदार शांताराम निंबेकर हे याबाबत अधिक तपास करत आहेत.

संतप्त नागरिकांनी केले आंदोलन

सदर घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी शिरवाडे वणी येथील गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात शिरवाडे फाटा येथे नागरिक जमा झाले होते. या ठिकाणी रोज एक तरी अपघात होत आहे. त्यामुळे चांदवडकडे व पिंपळगावकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूने मोठे स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे तसेच शिरवाडे फाटा याठिकाणी लवकरात लवकर उड्डाण पूल बांधण्यात यावा, जेणेकरुन अपघाताचे प्रमाण कमी होईल व जीवित हानी टळेल अशी मागणी करण्यासाठी दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जमावाचे सांत्वन केले.

संबंधित बातमी –

Three Shivsainik Died : मोटरसायकल आणि बसच्या भीषण अपघातात तीन शिवसैनिकांचा मृत्यू

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -