Saturday, July 18, 2026

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीला NEET परीक्षेत अवघे 87 गुण मिळाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, अधिकृत अँसर की तपासल्यानंतर स्वतःला ७०० हून अधिक गुण मिळतील, असा विश्वास ज्ञानेश्वरीला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात फक्त ८७ गुण दिसताच तिला आणि तिच्या कुटुंबाला जबर धक्का बसला. (NEET Results 2026)

ज्ञानेश्वरी ही गुणवंत विद्यार्थिनी असून NEET टॉपरच्या शर्यतीत असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. निकालानंतर तिने आपल्या OMR शीटमध्ये तफावत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे NEET निकालाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्ञानेश्वरीने सांगितले की, परीक्षेनंतर अँसर की तपासल्यावर अपेक्षित गुण पाहून तिने एम्स दिल्लीमध्ये प्रवेशाचे स्वप्न रंगवले होते. मात्र, स्कोअरकार्डवर केवळ 87 गुण पाहून ती पूर्णपणे हादरली. निकालानंतर विद्यार्थिनीला अश्रू अनावर झाले. (NEET Results 2026)

ज्ञानेश्वरीची आई मीरा पवार यांनीही परीक्षेच्या प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. "माझ्या मुलीला चुकीची OMR शीट देण्यात आली असावी. तिने वर्षभर दिवस-रात्र मेहनत घेतली, अनेकदा जेवणापेक्षाही अभ्यासाला प्राधान्य दिले. तिचे ७०० हून अधिक गुण येणे अपेक्षित होते," असे त्या म्हणाल्या. तसेच, OMR शीट लाईव्ह दाखवावी आणि संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (NEET Results 2026)

सोहमलाही मोठा धक्का; अपेक्षा ५२२ गुणांची, मिळाले फक्त ९५

दरम्यान, बीडमधील आणखी एक विद्यार्थी सोहम गवते याच्याबाबतही असाच प्रकार समोर आला आहे. अँसर कीनुसार सुमारे ५२२ गुण मिळतील, असा त्याचा विश्वास होता. मात्र, अंतिम निकालात त्याच्या स्कोअरकार्डवर केवळ ९५ गुण दिसले. निकाल पाहिल्यानंतर तो काही काळ कोणाशीही बोलला नाही, तर कुटुंबीयांनाही अश्रू अनावर झाले. (NEET Results 2026)

या दोन घटनांमुळे NEET निकालातील संभाव्य त्रुटी आणि OMR मूल्यांकन प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा संशय व्यक्त केला जात असून, विद्यार्थी आणि पालकांकडून सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. (NEET Results 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >