Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीBRS in Telangana : तेलंगणातील बीआरएसच्या दीड डझन नेत्यांचा पक्षाला रामराम

BRS in Telangana : तेलंगणातील बीआरएसच्या दीड डझन नेत्यांचा पक्षाला रामराम

महाराष्ट्रात बस्तान मांडण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री केसीआर यांना मोठा झटका, बीआरएसचे दीड डझन नेते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बस्तान मांडण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री केसीआर यांना त्यांच्या राज्यातच जोरदार झटका बसला असून तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) (BRS in Telangana) दीड डझन नेते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसला खिंडार पाडले आहे.

बीआरएसचे माजी खासदार पी. एस. रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव आदी नेते आज दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

खम्ममचे पीएस रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव, आमदार दामोदर रेड्डी आणि तीन-चार माजी आमदारांसह सुमारे दीड डझन नेते दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी सोमवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात या नेत्यांचे स्वागत करतील.

बीआरएसच्या बंडखोर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याअगोदर चर्चा करण्यासाठी सोमवारी नवी दिल्लीत तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांची पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. अविभाजित खम्मम आणि महबूबनगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. या बैठकीत बीआरएस आणि भाजपमधील आणखी नेते सहभागी होणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

या दोन्ही नेत्यांना पक्षविरोधी कारवायांसाठी एप्रिलमध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मधून निलंबित करण्यात आले होते. बीआरएसमध्ये सामील होण्यासाठी कृष्ण राव यांनी २०११ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. ते महबूबनगर जिल्ह्यातील कोल्लापूर मतदारसंघातून २०१४ मध्ये बीआरएसच्या तिकिटावर निवडून आले होते. आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या सगळ्या घडामोडींदरम्यान आणखी काही नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

बीआरएसची महाराष्ट्रात मोर्चे बांधणी

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव हे आक्रमक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाची मोर्चे बांधणी करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड आणि त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर येथे जाहीर सभा घेतल्यानंतर बीआरएस पक्षाची वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्त बीआरएस पक्षाचे सर्व मंत्रीमंडळासह पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हजर राहणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसमोर एकाच वेळेस बीआरएस पक्षाचे प्रमोशन होईल या उद्देशानेच हे सर्व केले जात असताना त्यांचे घर फोडण्यात काँग्रेसला यश आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -