कणकवली : पाटणा येथे झालेल्या भाजपविरोधी बैठकीवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली. उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे तर सत्तेसाठी कोणाच्याही बाजूने जातील, हे यातून दिसले. यावर टीका होताच उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले व निरर्थक धमक्या दिल्या. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. आमच्या कोणत्याही नेत्याला धमकी दिली तर तुमच्या नेत्यांना दोन पायांवर घरी जाऊ देणार नाही, जी भाषा तुम्ही वापराल तीच आम्ही वापरु, असे खडेबोल नितेश राणेंनी सुनावले.
नितेश राणे म्हणाले, पाटण्याला झालेल्या बैठकीवर भाजप नेत्यांकडून ही परिवार वाचवण्यासाठीची बैठक आहे, अशी टीका सर्वांनाच उद्देशून करण्यात आली होती. कुठेही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैयक्तिक टीका केली गेली नव्हती. मात्र, आपला मुलगा वाया गेला आहे, तो कार्टा निघाला आहे हे समजल्यानंतर शेवटी एका बिथरलेल्या बापाला वाटलं की सगळे माझ्या मुलाबद्दलच बोलत आहेत. मग त्याने आम्हीपण तुमचे परिवार काढू, व्हॉट्सअप चॅट काढू अशा मोठमोठ्या धमक्या दिल्या. पण उद्धव ठाकरे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना बोलण्याआधी तुमच्यासोबत ३९ वर्षे राहिलेल्या राणेंचा सामना करायला शिका, असं जळजळीत आव्हान नितेश राणेंनी दिलं. तसंच या ३९ वर्षांमधल्या तुमच्या कुंडल्या, तुम्ही कोणाच्या घरात, किचनमध्ये कसे घुसता या सगळ्याची माहिती आम्हाला आहे ती आम्ही महाराष्ट्राला द्यायला सुरुवात करु, असं नितेश राणे म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या कोविड घोटाळ्याबाबत तपासणीसाठी भाजप नेत्यांनी पद्धतशीर मागणी केली आणि त्यानुसार कारवाई सुरु झाली आहे. यात ज्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे तो सुरज चव्हाण महत्त्वाचा नाही तर सुरज चव्हाण सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये बसून कोणासाठी टेंडर मॅनेज करायचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या चौकशीमधून आदित्य ठाकरे, सरदेसाई, पाटणकर अशी राजकीय दबाव टाकणार्या सर्वांची नावं बाहेर आली पाहिजेत. उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचे व सख्ख्या भावाचे होऊ शकले नाहीत त्यामुळे नावं बाहेर काढणार्यांचं ते काहीही वाकडं करु शकणार नाहीत.
उद्धव ठाकरे कधी स्वतःच्या भावाचेही होऊ शकले नाहीत. बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडप करण्याचा जो कट उद्धव व त्यांच्या कुटुंबियांनी रचलाय व बाळासाहेबांना ज्या प्रकारे त्रास दिला आहे त्याबद्दल त्यांच्या सख्ख्या भावाने जयदेव ठाकरेंनी आधीच कोर्टामध्ये सांगून ठेवले आहे. राजकीय विरोधक तर सोडाच पण सख्खा भाऊही विरोधात आहे, असा टोला नितेश राणेंनी लगावला.
उद्धव ठाकरे तुम्ही काय खोक्यांवरुन आरोप करता? उलट तुम्ही खोक्यांवरच आयुष्य जगता. लंडनचा दौरा, मातोश्रीवरचा चहा, हेच नाही तर अंगावरचा साबणसुद्धा तुम्ही दुसर्यांच्या पैशाने लावता.
संजय राजाराम राऊत हा साधा संपादक आहे पण तो कोविडचा भ्रष्टाचार करतो, असा आरोप नितेश राणेंनी केला. महाराष्ट्रात असलेल्या मोठमोठ्या संपादकांचं आणि पत्रकारितेचं नाव बदनाम करण्याचं काम तो करतो. साध्या संपादकाचं राहणीमान बघा. कोविडमध्ये लोकं एका बाजूला मरत होती तेव्हा यांची लूटमार चालू होती.
१ जुलैला पेंग्विनला मोर्चाच काढायचा असेल तर दिनू मौर्यच्या घरावर काढावा. तिथे साडेसातच्या नंतर काय तमाशे चालायचे याचेही आमच्याकडे व्हिडीओ आहेत. १ तारखेला हवं तर स्क्रीन लावून दाखवतो म्हणजे कुठे कसे मोर्चे काढायचे हे कळेल, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे, तुम्ही काय व्हॉट्सअपच्या बाता करता? आमच्याकडे वैभव चेंबरचे सीसीटीव्ही आहेत. चौथ्या माळ्यावर कुठल्या वहिनी यायच्या, कुठले अधिकारी यायचे, किती वाजता वहिनी मिटिंग घ्यायच्या, कोणाकोणाला तिथे बोलवायच्या याचे १३ कॉल रेकॉर्डिंग्ज माझ्याकडे आहेत. उद्धव ठाकरे व त्यांच्या घरच्यांनी कसे खोके मागितले आणि त्यांचा बॉडीगार्ड राजपूतने ते कसे पोहोचवले याचे १३ कॉल रेकॉर्डिंग्ज माझ्याकडे आहेत, असं नितेश राणे म्हणाले. त्यामुळे जास्त फडफड केलीत, आम्हाला धमक्या दिल्यात तर एकही कपडा अंगावर ठेवणार नाही, असे नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना खडसावले.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…