राजापूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या कार्यकाळाची ९ वर्षे पूर्ण केली. यानिमित्त देशभरात ‘मोदी@९’ (Modi@9) जनसंपर्क अभियान राबवण्यात येत असून अनेक ठिकाणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते पंतप्रधानांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नाशिकमध्ये सभा घेतल्यानंतर आता केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर (Rajapur) तालुक्यात २६ जूनला सभा घेणार आहेत.
या सभेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते आणि मोदी @९ अभियानाचे महाराष्ट्र संयोजक प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आणि भाजपाची इतर नेतेमंडळी हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मोदी @९ अभियानांतर्गत देशभरात आयोजित केलेल्या ५१ सभांपैकी ही एक मोठी सभा असणार आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery)जागेला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या भेटीनंतर नारायण राणेंची या ठिकाणी सभा होणार होती. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे ही सभा पुढे ढकलण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला होता. आता या सभेची तारीख ठरली असून २६ जूनला या सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. ज्या भागांमध्ये आपली शक्ती कमी पडते आहे, ती वाढवण्याची भाजपची रणनीती आहे, त्याच दृष्टीने देशभरात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…