Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीCM Eknath Shinde: ट्रॅक पँट आणि ब्ल्यु टी शर्ट....मुख्यंमत्री रमले गावच्या शेतीत

CM Eknath Shinde: ट्रॅक पँट आणि ब्ल्यु टी शर्ट….मुख्यंमत्री रमले गावच्या शेतीत

सातारा: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दोन दिवसांसाठी त्यांच्या सातारा (satara) जिल्ह्यातील दरे या गावी आले आहेत. यावेळी ते आपल्या पत्नीसह शेतीत रमले. त्यांनी आपल्या शेतात पत्नीसह केळीची लागवड (banana trees) आणि नारळाच्या झाडांची (Coconut Trees) केली. त्यांनी पाच हजार केळींच्या झाडांची लागवड केली. तसेच नारळाच्या झाडांची देखील लागवड केली. मला शेतीची आवड आहे. मी प्रत्येक वेळी आलो की झाडे वाढवतो असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्नी लताताई शिंदे या देखील शेतात उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मला शेतीची आवड आहे. मी नेहमी शेताकडे येत असते. गेल्या वेळेस हळदीच्या झाडांची लागवड केली होती. यावेळेस केळीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. माझ्या मुलाला तसेच साहेबांनी देखील शेतीची आवड असल्याची माहिती लताताई शिंदे यांनी दिली.

कोयना धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

कोयना धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. हा गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या कामाचा शुभारंभ देखील मुख्यमंतरी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी कोयनेच्या पात्रातून फेरफटका मारला. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्ती शेती करण्याचे धोरणं अवलंबल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. धरणातील गाळ शेतीसाठी उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे अनेक ग्रामस्थ समस्या घेऊन तसेच त्यांची कामे घेऊन आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -