नागपूर: नागपूरमध्ये तीन चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये आढळ्याने खळबळ उडाली आहे. काल खेळताना ही तिन्ही मुले बेपत्ता झाली होती. नागपूरच्या फारूक नगरमध्ये एका कारमध्ये तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळलेत. दरम्यान या घटनेच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राच्या उपराजधानीत एका लहान मुलाला चोरुन नेताना एका मध्य प्रदेशमधून आलेल्या एका आरोपीला पोलिसांना पकडले. तसेच नागपूरात गेल्या काही दिवसांपासून मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या घातपाताची शंका नागपूर पोलिसांनी आहे. नागपूर पोलिस त्याबाबत तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार घटनास्थळाजवळ कार दुरुस्ती करणारे गॅरेज आहे. त्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली इकोस्पोर्ट कार एका बंद घरासमोर उभी होती. त्या कारला गडद काळ्या रंगाच्या फिल्मस लागलेल्या होत्या आणि त्याच कारमध्ये ही मुलं जाऊन बसली असावी. आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.