- निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप, पण भाजपने राखला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचाही मान
मुंबई (सचिन धानजी)
मुंबई महापालिकेच्या निधी वाटपात भेदभाव झाला असल्याचा आरोप उबाठा आणि काँग्रेसकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात भाजपने उबाठासह काँग्रेसच्या काही नगरसेवकांना भरुभरुन निधी दिल्याचे दिसून येत आहे. स्थायी समितीच्यावतीने अर्थसंकल्पात विकास कामांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीमध्ये उबाठा आणि काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये भरीव तरतूद केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना महायुतीकडून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना निधी न दिल्याचा आरोप न करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेसच्या नेत्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्प्ष्ट होत आहे.
मात्र, उबाठाच्या नगरसेवकांना विकास निधी दिला नसला तरी माहिम, शिवाजीपार्कमधील उबाठा नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मेाठ्याप्रमाणात निधीची तरतूद दिसून येत आहे. याशिवाय भांडुप पश्चिममधील उबाठाच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपयांची तरतूद दिसून येत आहे.
माहिम, दादर परिसर
पंडित दिनदयाळ उद्यान येथील मोडकळीस आलेल्या व्यायामशाळांचे नुतनीकरण : २५ लाख
शिवाजीपार्क चौपाटी येथे सुशोभीकरण : २५ लाख रुपये
महाराष्ट्र् संयुक्त कलादालन : ५ लाख रुपये
शिवाजीपार्क मैदानात पाणी फवारणीकरता स्प्रिंकलर्स : २५ लाख रुपये
माहिम येथील स्वामी विवेकानंद उद्यानाचे सुशोभीकरण : ५० लाख रुपये
भागोजी किर स्मशानभूती सुशोभिकरण व नुतनीकरण : २५लाख रुपये
भांडुप पश्चिम,कांजूर गाव
एस विभागातील भांडुप पश्चिम येथील गावदेवी रोड, टेंबीपाडा येथील गलिच्छ वस्तींची सुधारणा : १ कोटी रुपये
भांडुप प्रकाश नगर,आझाद नगर : १ कोटी रुपये
एस विभागातील भांडुप पश्चिम येथील रावते कंपाऊंड १,२,३येथे गटार लादीकरण : ५० लाख रुपये
भांडुप पश्चिम येथील रामनगर तानाजी वाडी,आंब्याची भरणी येथील गटार,लादीकरण : ५० लाख रुपये
मदनुपरा, नागपाडा
मदनपुरा ड्रेनेज : ७५ लाख रुपये
मदनपुरा नयानगर, ७५ लाख रुपये
चौथी साखळी रस्ता : ५० लाख रुपये






