Saregama Little Champs: आमचं ठरलंय! मॉनिटर आणि मोदकाने दिली नात्याची कबुली

मुंबई: सारेगमप लिटील चॅम्प फेम मोदक आणि मॉनिटर यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) याच्या सोशल मीडियावरील पोस्टने दोघांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कारण, प्रथमेशने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली देत 'आमचं ठरलंय' अशी कॅप्शन लिहित मुग्धा वैशंपायनसोबत (Mugdha Vaishampayan) फोटो पोस्ट केला आहे.








जसे तुम्ही सर्व अपेक्षा करत होते, त्याप्रमाणेच आता आम्ही दोघे कबुली देतो - आमचं ठरलंय! असं प्रथमेश लघाटेने इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे. शिवाय या पोस्टला त्याने #MGotModak #ModakGotMonitor #forever #couplegoals असे हॅशटॅग देखील दिले आहेत. या हॅशटॅगवरून हे दोघे प्रेमात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.


प्रथमेश लघाटेने मॉनिटर, अर्थात मुग्धा वैशंपायन हिच्यासोबत सूर जुळल्याची कबुली फेसबूक पोस्ट करत देखील दिली आहे, दोघे एकत्र असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. प्रथमेशची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. प्रथमेशच्या या पोस्टवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, कार्तिकी गायकवाड, सुकन्या मोने, प्रियांका बर्वे यांच्यासह अनेकांनी प्रथमेश-मुग्धाचं अभिनंदन केलं आहे. कार्तिकी गायकवाडने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, ये बात... खूप खूप अभिनंदन... तर सुकन्या मोने यांनी म्हटलं आहे की, कल्पना होतीच... पण नक्की ना! काहीतरी गुगली नाही ना? तर संगीतकार राहुल देशपांडे यांनी देखील दोघांचंही अभिनंदन केलं आहे.


मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या चाहत्यांकडूनही या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रथमेश रत्‍नागिरी जिल्ह्यातील आरवली गावात राहणारा आहे. तर, मुग्धानं गायनाबरोबर नृत्याचं देखील शिक्षण घेतलं आहे. अनेकदा मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे सोशल मीडियावर एकत्र गाणी गाताना देखील दिसतात. आतापर्यंत अनेक गाणी या दोघांनी एकत्र गायली आहेत. हे दोघे नेहमी गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि या जोडीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आजवर सर्वजण त्यांना लिटिल चॅम्प म्हणून संबोधत होते, पण आता ही मुलं मोठी झाली आहेत.




Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं