धार्मिक शिक्षण देत असल्याच्या आरोपाखाली सत्य मलिक संस्थेवर गुन्हा दाखल

पालकमंत्री दादा भुसे पोलिस प्रशासनावर भडकले


मालेगाव : सध्या राज्यात धार्मिक वादांवरुन तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यात दंगली होत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच धार्मिक शिक्षण देण्याच्या आरोपावरुन वाद झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये करिअर गाईडन्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण आणि धर्म परिवर्तनाचे धडे दिले जात असल्याचा आरोप करत काल ११ जूनला हिंदुत्ववादी संघटनांनी मसगा येथील कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला. सत्य मलिक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.


मालेगावच्या मसगा महाविद्यालयात सत्य मलिक संस्थेने भारतीय छात्र सेनेतर्फे अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शनावर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख्य व्याख्यात्यांनी प्रथम ‘कुराण’ मधील कलमा पढवत इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमांप्रमाणे शिक्षण करण्याचं आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेमुळे नाशिकच्या मालेगावमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. इतर धर्मांचा अनादर केल्याने सत्य मलिक संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कायदेशीर कारवाई चालू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी दिली.


मात्र पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याचा आरोप करत पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव पोलिसांना खडसावलं. त्यांनी थेट मालेगाव कॅम्प पोलीस स्थानक गाठत दोन तास पोलिसांना सुनावलं. जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.


हिंदुत्ववादी संघटनेचे दीपक जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मुलांना इथे जबरदस्ती बोलावण्यात आलं. त्यांच्या राहण्या खाण्याचीही सोय केली गेली नाही. त्या मुलांकडून 'इथे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कुठलाही प्रकार झाला नाही व आम्हांला व्यवसाय मार्गदर्शन देण्यात आलं', असं खोटं स्टेटमेंट लिहून घेण्यात आलं. पालकमंत्र्यांनी इथे येऊन केलेल्या शहानिशेमुळे संस्था खोटी पडली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


घडलेल्या प्रकाराची दखल घेत महाविद्यालय प्रशासनानं कार्यक्रमांचं आयोजन करताना व्यवस्थापनाची परवानगी न घेतल्यानं महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तडकाफडकी निलंबित केलं. पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत कार्यक्रमांचे आयोजक आणि व्याख्याते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन