मुरूड: रोहा, अलिबाग व मुरुड या तीन तालुक्याला जोडणारा साळाव पूलाच्या दुरुस्तीसाठी तीन दिवस सुरू असलेले लोड टेस्टिंगचे काम झाले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उद्या सकाळी ६ वाजल्यापासून पाच टनाखालील वाहतूकीसाठी खुला करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
साळाव पूलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी ८ ते १० जून या काळात लोड टेस्टिंगसाठी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, तर प्रवासी व नागरिकांना पायी चालत जाण्याची मुभा देण्यात आली होती. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आल्याने याचा पर्यटन व्यवसाय व स्थानिक बाजार पेठेवर याचा परिणाम दिसून आला. उद्या सकाळ पासून हा पूल पाच टनाखालील वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याने टू- व्हीलर, थ्री-व्हीलर व फोर-व्हीलर वाहन चालकांना पुलावरून ये-जा करण्याचा मार्ग खुला झाला आहे. अवजड वाहने, एसटी सेवाही लवकरच सुरू केली जावी, अशी अपेक्षा नागरिक व प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…