अब्बु आझमी आणि औरंगजेबांवर थुंकून दाखवा : नितेश राणे

नितेश राणे यांनी संजय राऊतांचा घेतला समाचार


संजय राऊतांना पुरवले अग्रलेखाचे विषय


सिंधुदुर्ग : संजय राऊत महाराष्ट्रात होणार्‍या दंगलींबाबत भाजपला दोष देत आहेत. मात्र त्यांचा पक्षाचा गैरकारभार केवढा मोठा आहे आणि संजय राऊतांना स्वतःच्याच पक्षात महत्त्व नाही हे दाखवून देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला.


संजय राऊत छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून भाजपच्या कामांवर टीका करत आहेत. पण त्यांना विचारेन की, काल शरद पवारांनी 'मी छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार' असं जे विधान केलं, त्यावर त्यांना आव्हान देण्याची तुमची हिंमत आहे का? छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करण्याची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. मग त्यांच्या विचारांशी तुम्ही आणि तुमचा मालक किती एकनिष्ठ आहात, हे समजेल. तुमची आव्हान देण्याची हिंमत नाही तिथेच तुम्ही महाविकास आघाडीतली तुमची लायकी ओळखावी. हे बोलताना संजय राऊतांचा 'भांडुपचा देवानंद' असा उल्लेख करत नितेश राणेंनी खिल्ली उडवली.


पुढे नितेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दंगली होण्याच्या काही महिन्यांअगोदरच महाराष्ट्रात दंगली होणार, असे वक्तव्य केले होते. काँग्रेसच्या कोल्हापूरमधील एका नेत्यानेदेखील कोल्हापूरमध्ये दंगल होणार असा दावा केला होता. यांना पूर्वसूचना कशा मिळाल्या? त्यामुळे दंगलींबाबत भाजपवर आरोप करण्यापेक्षा आणि मणिपूर हिंसाचारावरून अग्रलेख लिहिण्यापेक्षा संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतल्या त्यांच्या या सहकार्‍यांना दंगलीबाबत विचारावं. यासंबंधी उद्धव ठाकरेंकडून ट्रेनिंग घेतलं जातं की काय? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.



४०० जणांच्या धर्मांतरावर अग्रलेख लिहावा

आव्हाडांच्या मतदारसंघामध्ये ४०० जणांचं धर्मांतर झाल्याची माहिती मिळत आहे. याबद्दल संजय राऊतांनी सविस्तर अग्रलेख लिहावा, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं. यातूनच कोणाचं औरंगजेबावर प्रेम आहे हे दिसून येत आहे, असंही नितेश राणे म्हणाले.



अब्बु आझमी आणि औरंगजेबांवर थुंकून दाखवा

याचवेळी नितेश राणेंनी आणखी एका बाबतीत संजय राऊतांना तोंडावर पाडलं आहे. ते म्हणाले, "ज्यांना संभाजीनगर बोलता येत नाही अशांना आव्हान द्यायची तुमची हिंमत होत नाही आणि आमच्या नेत्यांची नावं काढल्यावर तुम्ही थुंकता? तुम्हाला थुंकायचीच सवय असेल तर काल समाजवादी पक्षाचे नेते अब्बु आझमींनी 'मी औरंगजेबला मानतो, तो माझा नेता आहे', अशा जाहीरपणे केलेल्या वक्तव्यानंतर अब्बु आझमी आणि औरंगजेबांवर थुंकून दाखवा मग बघा तुमच्या ढुंगणावर लाथा मारुन कसं तुम्हाला महाविकास आघाडीतून बाहेर काढतील".



मातोश्री २ चा खरा मालक नंदकिशोर चतुर्वेदी

उद्धव ठाकरे ज्याच्याकडे खोके ठेवतात अशा मातोश्री २ चा खरा मालक नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या घरावर काल असंख्य छापे पडले. त्याच्याच कंपनीतून उद्धव ठाकरेंचा मेहुणा श्रीधर पाटणकरला पैसे पुरवले गेले आहेत, असा आरोप नितेश राणेंनी केला. नंदकिशोर आता स्वतः फरार आहे, त्याला लपवलंय किंवा गायब केलंय का याबाबत संजय राऊतांनी अग्रलेख लिहावा.


संजय राऊत शिंदेसाहेबांना भेटतील


याचवेळी आदित्य ठाकरेंचं संजय राऊत यांच्याशी पटत नाही, असं नितेश राणे म्हणाले. त्यांनी सुरु केलेल्या 'आवाज कोणाचा' या पॉडकास्टमध्ये आदेश बांदेकर पहिली मुलाखत अनिल परब यांची घेणार आहेत. म्हणजेच संजय राऊतांना कुठेही स्थान नाही. काल जसं सेनाभवनचे काही कर्मचारी पगार मिळत नाही म्हणून शिंदेसाहेबांना जाऊन भेटले, तसंच उद्या संजय राऊतही पगार देत नाहीत म्हणून शिंदेसाहेबांना जाऊन भेटले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांचे वाभाडे काढले.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी