लोड टेस्टींगसाठी गुरुवार पासून तीन दिवस साळाव पूल पुर्णपणे बंद

अतिअवजड वाहतुकीमुळे होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने निर्णय


मुरूड : मुरूड - अलिबाग तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलावरून पाच टन वजनावरील वाहनांना यापूर्वीच बंदी घातली होती. मात्र आता महत्त्वाच्या भागाची दुरुस्ती सुरू झाल्याने पुलाला हानी पोहोचू नये, याकरता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गुरुवार ८ जूनपासून तीन दिवसांसाठी पूल बंद असणार आहे.


अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार रेवदंडा - साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच पुलाची पुनर्बांधणी व लोड टेस्टिंगचे काम करण्यासाठी रेवदंडा- साळाव पूल पुढील २० दिवसांसाठी बंद राहील. पुलावरून ५ टन वजनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. मात्र लोड टेस्टिंगच्या कामामुळे सर्व प्रकारची वाहतूक ८ ते १० जून या तीन दिवसांदरम्यान बंद करण्यात आली आहे.


अलिबाग ते साळाव दरम्यान होणा-या अवजड वाहनाच्या वाहतुकीसाठी अलिबाग -पोयनाड - वडखळ - नागोठणे - कोलाड - साळाव असा पर्यायी मार्ग आहे. तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग - बेलकडे - वावे - सुडकोली - रोहा - तळेखार - साळावमार्गे आहे. मुरूड - अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूकीसाठी मुरूड - साळाव - तळेखार -चणेरा - रोहा - कोलाड - नागोठणे - वडखळ - पोयनाड - अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापर होऊ शकतो.

Comments
Add Comment

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,

जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. २४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण