Monday, June 16, 2025

सिंधुदुर्गामध्ये 'शासन आपल्या दारी'चा चौथा कार्यक्रम

सिंधुदुर्गामध्ये 'शासन आपल्या दारी'चा चौथा कार्यक्रम

सिंधुदुर्ग : आज सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्र शासनाच्या 'शासन आपल्या दारी'चा मोठा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्यातील हा चौथा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नव्या योजनांची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.


उद्योगमंत्री उदय सामंतदेखील स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. आज ज्या योजनांची घोषणा होईल त्यामध्ये 'सिंधुरत्न' ही एक योजना राबवण्यात येणार आहे. सिंधुरत्नचा मच्छीमारांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.


सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या योजनांमधून अपंगांसाठी गाड्या, शेतकर्‍यांना ट्रॅक्टर्स, शेतीसाठी कुंपण तसेच कामगारांना युनिट देण्यात येणार आहेत, असं उदय सामंत म्हणाले. तसेच हा कार्यक्रम पुढे कायम चालू ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत, असं उदय सामंत म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >