मेळघाट : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ४ महिन्यांत तब्बल २६९ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक आकडेवारी उघडकीस आली आहे. याच काळात प्रसुतीदरम्यान ५ माता दगावल्याची माहिती मिळाली आहे.
अमरावतीतील मेळघाटाला मातामृत्यू आणि बालमृत्यूचा मोठा डाग लागला आहे आणि हे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकार आता यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.