अपघाताला कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा


मृतांचा आकडा २८८ वर, ५६ गंभीर


बालासोर: ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या २८८ वर पोहोचली आहे. तर ७४७ लोक जखमी आहेत आणि ५६ जणांची प्रकृती गंभीर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावर जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. याशिवाय मोदींनी रूग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली. "अपघाताला कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल", असा इशारा त्यांनी यावेळी दिला.





जखमींची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, ओडिशा सरकार आणि येथील अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ज्या काही सुविधा आहेत, त्यांचा वापर करून जे काही करता येईल ते केलं. जास्तीत जास्त लोकांची मदत कशी करता येईल यासाठी येथील स्थानिकांनी पुढाकार घेतला. रक्तदान असो अथवा बचावकार्य. यामध्ये सहभागी असलेल्या स्थानिक तरूणांचा मी आभारी आहे.



तरूणाईचा मदतीचा हात


ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला