वंदे भारतबाबत मोठी घोषणा! जून पर्यंत देशातील सर्व राज्यांत पोहोचणार

नवी दिल्ली : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी वंदे भारत ट्रेनबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, वंदे भारत ट्रेन जूनपर्यंत सर्व राज्यांमध्ये पोहोचेल. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत २०० शहरे 'वंदे भारत'शी जोडण्याचे आमचे ध्येय आहे.


राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बोलत होते. ते म्हणाले, भारताची वंदे भारत ट्रेन ही जागतिक दर्जाची ट्रेन बनली आहे, जी ताशी १६०-१८० किमी वेगाने धावते. अशा ट्रेन तयार करण्याची क्षमता जगातील फक्त ८ देशांमध्ये आहे.


दरम्यान, त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, २००४ ते २०१४ हे दशक भारतासाठी हरवलेले दशक असल्याचे म्हटले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने बरीच प्रगती केली आणि भारताची अर्थव्यवस्था जगात ५ व्या क्रमांकावर आणली, असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक

गॅस सिलिंडरच्या मागणीत २० ते २२ लाखांनी वाढ

नवी दिल्ली : गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक

मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम