काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

  389

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी किडनी स्टोनसारख्या आजारावर उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याने राज्य व काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली आहे. बाळू धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. परंतु शस्त्रक्रियेदरम्यान प्रकृती खालावत गेल्याने २८ मे ला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर, आज मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.


खासदार बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचं चार दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन बाळू धानोरकरांनी घेतलं. परंतु, प्रकृती अस्वास्थतेमुळे ते अंतिम संस्काराला जाऊ शकले नाहीत. अखेर, आज पहाटे बाळू धानोरकर यांचंही निधन झालं. पिता-पुत्राच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


बाळू धानोरकर हे मूळचे शिवसैनिक होते. स्थानिक पातळीवर जम बसवल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडूनच आमदारकी मिळवली. २०१९ च्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांना काँग्रेसमधून खासदारकीचं तिकिट मिळालं. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी आमदार झालेले बाळू धानोरकर २०१९ मध्ये खासदार झाले. त्यांनी पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाही विधानसभेत निवडून आणले.


धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथील निवासस्थानी दुपारी १.३० वाजता आणण्यात येणार आहे. हे पार्थिव आज ३० मे रोजी दुपारी २ वाजल्यापासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची